
आंतरराष्ट्रीय इंडियन चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार सोहळा रविवारी जयपूरमध्ये पार पडला. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने सर्वाधिक 10 पुरस्कार जिंकले. ‘लापता लेडीज’ या चित्रपटासाठी किरण राव आणि आमीर खान यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘भूलभुलैया 3’ साठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर ‘लापता लेडीज’साठी नितांशी गोयलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार राम संपत (‘लापता लेडीज’) या चित्रपटाला देण्यात आला. ‘आर्टिकल 370’ चित्रपटातील ‘दुआ’ या गाण्यासाठी जुबिन नौटियाल यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार मिळाला. ‘भूलभुलैया 3’ चित्रपटातील ‘अमी जे तोमार 3.0’ या गाण्यासाठी श्रेया घोषालला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) पुरस्कार मिळाला.
रेखा–माधुरीचा अफलातून डान्स
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि माधुरी दीक्षित यांनी स्टेजवर अफलातून डान्स केला. करिना कपूर आणि शाहिद कपूर यांनीही डान्स केला. रेखाने दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यासोबत ‘हस्ते हस्ते कट जाय रास्ते’ या गाण्यावर डान्स केला. त्यांच्या डान्सला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.