बद्रीनाथमध्ये भूस्खलनामुळे भाविक अडकले, अभिनेत्री कविता कौशिकने सांगितली आँखोदेखी

अलीकडेच जोशीमठ- बद्रिनाथ महामार्गावर दरड कोसळल्याने अनेक यात्रेकरू अडकले. यामध्ये कविता कौशिक ही अभिनेत्रीही होती. कविताला चार दिवस मिलिट्री कॅम्पमध्ये रहावे लागले. शनिवारी सुरक्षित बाहेर आल्यानंतर ती काशीपूरकडे रवाना झाली.

कविता 30 जून रोजी तिचा पती रोनित बिस्वास, भाऊ  यांच्यासोबत बद्रीनाथाच्या दर्शनासाठी गेली होती आणि तिथून परतत असताना रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे ती अडकली. तिथल्या मिलिट्री कॅम्पमध्ये राहिली. तिथल्या परिस्थितीची माहिती कविताने एका मुलाखतीत दिली. ती म्हणाली, ‘महामार्गावर हजारहून अधिक गाडया अडकल्या आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि अनेक संघटना सातत्याने काम करत आहेत. लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत. येथे भीषण परिस्थिती असूनही सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि ते कोणत्याही अडचणीत सापडणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेत आहेत असे तीने सांगितले.’