किल्ले रायगडच्या कड्यावरून टकमकी आदिवासी वाडीजवळ मोठी दरड कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. आदिवासी वाडीपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामसेवक व्ही. डी. जाधव यांच्यासह तलाठी, कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेत आदिवासी कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले. ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या परिसरात दोन आदिवासी वाड्यांमधून 70 ते 75 कुटुंबे मिळून 300 जण राहतात. दरड कोसळल्याची माहिती मिळताच महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून शासकीय यंत्रणा दक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.