
जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची पाटण्यातील ईडी कार्यालयात तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. लालू प्रसाद यादव यांचे संपूर्ण कुटूंबच सध्या जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात आहे. मंगळवारी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे पुत्र तेज प्रताप यांची चार तास चौकशी करण्यात आली. राबडी देवी आणि तेज प्रताप यादव यांना वेगवेगळ्या खोलीत बसवून चौकशी करण्यात आली. आज लालू प्रसाद यादव चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले.