नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला रेल्वे जवाबदार, लालू प्रसाद यादव यांची टीका

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंरगीची घटना ताजी असताना शविवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेसाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. नवी दिल्लीतील दुर्घटनेत रेल्वेची चूक असल्याते ते म्हणाले.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी बाबत बोलताना लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे. हा अपघात रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक दुःखद घटना घडली आहे. आम्ही मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. ही रेल्वेची चूक आहे. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. हे रेल्वेचे अपयश आहे. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, असे ते म्हणाले.


दरम्यान कुंभमेळ्यात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावर कुंभ निरुपयोगी आहे, त्याला काही अर्थ नाही. असे वादग्रस्थ विधान लालू प्रसाद यांनी केले.