चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार या दोन बाबूंच्या टेकूवर सत्तेत स्वार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबाबत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मोदींचे सरकार ऑगस्ट महिन्यात कोसळेल, असे भाकीत लालूंनी केले.
केंद्रात बसलेलं मोदी सरकार कमकुवत आहे. ऑगस्ट महिन्यांत हे सरकार पडणार, हे मी आज तुम्हाला सांगतो, असे लालू म्हणाले. ते राजदच्या 28 व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. लोकसभा निवडणुकीत जी कामगिरी पक्षाने करून दाखवली ती उत्तम आहे. येत्या काळात राजद पक्ष अधिक चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.