लालबागमध्ये मुंबईचा राजा आर्ट फेस्टिव्हल

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मुंबईचा राजा आर्ट फेस्टिव्हल आणि गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन गणेशगल्ली, लालबाग येथे केले आहे. या दोन दिवसीय कला महोत्सवाचे उद्घाटन 29 मार्चला सायंकाळी 6 वाजता सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते होईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ पोर्टेट्स, प्राचीन नाणी, ऐतिहासिक शस्त्रास्त्रs यांच्या भव्य प्रदर्शनाचे दालन उभारण्यात येईल.

महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला आणि लोकनृत्यांचे सादरीकरण 29 मार्चला होईल, तर 30 मार्च रोजी प्रसिदद्ध गायक राम पंडित यांचा लाइव्ह गायनाचा कार्यक्रम होईल. तसेच या कला महोत्सवात मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे कलाकार यांचा सहभाग असणार आहे. गुढीपाडव्याला सकाळी 10 वाजता गणेशगल्लीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात येईल. पुणेरी ढोल पथकाचे भव्य सादरीकरण आणि मराठमोळे पारंपरिक कार्यक्रम असतील, अशी माहिती सरचिटणीस स्वप्नील परब यांनी दिली.