
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यातील लभार्थी महिलांची संख्या कमी होत आहे. याच पडताळणीत पुण्यातून मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News – शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख 11 हजार 991 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत अशा 16 हजार बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ज्या लाभार्थी महिलांनी चुकीची कागदपत्रे व आधार क्रमांक दिले आहेत, त्यांचीही माहिती अद्ययावत करण्याचे काम प्रशासन करत आहे. अशातच ज्या महिलांनी चुकीची माहिती भरली आहे त्यांची देखील पडताळणी सुरू आहे.