लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर ताण, मंत्री दत्तात्रय भरणे यांचा महायुती सरकारला घरचा आहेर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर करून 1500 रुपये देणाऱ्या राज्य सरकारला आता तिजोरीवरील आर्थिक बोजा सहन होत नसल्याने महायुती सरकारने निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यास सुरवात केली आहे. यातच आता मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

एका सभेत मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत की, “लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर ताण आहे, हे मान्य केलं पाहिजे. म्हणून यावेळी कृपया कमी विनंती पत्रे पाठवा. मी सरकारमध्ये असलो किंवा विरोधी पक्षात असलो तरी सरकारकडून निधी कधी, कसे आणि कुठून आणायचे हे मला चांगलं माहीत आहे.”.