लाडक्या बहिणींसाठी हमीपत्र ठरणार डोकेदुखी! सरकारकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेसदंर्भात नवी अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. या पडताळणीत हमीपत्रात दिलेल्या माहिती तपासली जात आहे. वार्षिक उत्पन्न, वाहन मालकी, जमीन मालकी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश आहे. या पडताळणीमुळे काही लाभार्थींना अडचण येऊ शकते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जे अर्ज दाखल करण्यात आलेत. त्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरतानाच एक हमीपत्र लिहून दिले होते. आता त्याच हमीपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे लाभार्थी महिलांकडून मागितली जात आहेत. ही पडताळणी केल्यावर काही बहिणी अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे हमीपत्र बहिणींची डोकेदुखी ठरणार आहे.

काय आहे हमीपत्रात?

> माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.

> माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.

> मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितर/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

> मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.1,500/- पेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.

> माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किया माजी खासदार/आमदार नाही.

> माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपरिशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.

> माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.

> माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.

> मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.