लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

लाडकी बहिण योजनेतून आतापर्यंत लाखो महिलांना अपात्र ठरवत बाद करण्यात आले आहे. त्यात आता फेब्रुवारी महिना उलटला तरी अद्याप त्या महिन्याचा 1500 चा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामळे सध्या सरकारच्या लाडक्या बहिणी आपल्याला हप्ता मिळणार की नाही की त्या अपात्र ठरणार या चिंतेत आहेत. दरम्यान याबाबत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना लाडकी बहिण योजनेबाबत माहिती दिली आहे. ”लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पण नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. कॅगने काही बंधने टाकली आहेत. एखादी योजना सुरू केल्यानंतर त्यात बसणाऱ्यांना पैसे देण्यात येतात. जे योजनेत बसत नाहीत त्यांना पैसे देता येत नाहीत. आम्ही त्या साठी कारवाई करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार?

फेबुवारी महिन्याचे पैसे मार्च उजाडला तरी अद्याप मिळालेले नाही. दरम्यान मार्च व फेब्रुवारी महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र देणार असल्याचे समजते.