महिला मतदार डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरसकट प्रत्येक अर्जदार महिलेला प्रति महिना दीड हजार रुपये खात्यात पाठवण्यात आले. मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना दे धक्का देण्यात येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ही माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले.
सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बनावट अर्जदारांना…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 31, 2025