आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये; अजितदादा म्हणतात, सर्व सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असे आम्ही कधीही म्हणालो नाही. सर्व सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. कबूल केल्याप्रमाणे सध्या आम्ही दीड हजार रुपये देत आहोत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याची कबुली विधानसभेत दिली.

शेतकरी कर्जमाफीबद्दल सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे एवढेच मोघम उत्तर अजित पवार यांनी दिले.

n सध्या राज्याचे स्थूल उत्पन्न 49 लाख 39 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे सरकारची महसुली तूट ही 1 टक्क्यांच्या आत आहे. तथापि 2025-26 या आर्थिक वर्षात 100 टक्के महसूल जमा करून राज्याला आर्थिक शिस्त लावायची असल्याचे त्यांनी सांगितले.