लाडक्या बहिणींना महसूल वाढल्यानंतर 2100 रुपये

विधानसभा निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी राज्यमंत्री आशीष जैयस्वाल यांना विचारले असता, राज्याच्या महसुलात वाढ झाल्यावर सरकार वचनाची पूर्तता करील. महसुलात वाढ झाल्यावर त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध विभागांना निधीचे वितरण केले जाते. त्यामुळे महसुलात वाढ झाल्यावर नमो शेतकरी योजना व लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार घोषणांची पूर्तता करील.