Photo – फुलांचा मोहोत्सव! लडाखचा ‘जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल’

कश्मीर खोऱ्यातील लडाखमध्ये ‘जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल’ला 10 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. हा महोत्सव 4 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांना लडाखचा हा फुलांचा महोत्सव पाहण्याची संधी दरवर्षी मिळते. हा महोत्सव कारगील आणि लेह जिह्यातील अनेक गावांत साजरा केला जातो. जपानमधील प्रसिद्ध चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलप्रमाणेच हा फेस्टिव्हल आहे. या महोत्सवामध्ये पर्यटकांना कश्मीरची संस्पृती, पारंपरिक खाद्यपदार्थांची पाकपृती अनुभवण्याची संधी मिळते.