विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करणाऱया मिंधे सरकारने ‘लाडका भाऊ’ योजनेची घोषणा केली आहे. पंढपूर येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडका भाऊ’ योजनेअंतर्गत बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरीदेखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील, अॅप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपेंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.