काय सांगता! लग्नाच्या तीन मिनिटांनंतर घटस्फोट

घटस्फोट घ्यायला आता मोठे कारण लागत नाही. नवरा-बायको छोटय़ा छोटय़ा कारणांवरूनही घटस्फोट घेत आहेत. लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत नवरा-बायकोने घटस्फोट घेतल्याची घटना कुवैतमध्ये उघडकीस आली आहे.

कोर्ट मॅरेज केल्यानंतर नवरी कोर्टाच्या पायरीवरून खाली उतरत होती त्याच वेळी तिचा पाय घसरला. नवरी खाली पडतेय, हे पाहून नवरदेवाने तिला मूर्ख असे म्हटले. नवऱ्याने मूर्ख म्हणताच नवरीला संताप अनावर झाला. ती तत्काळ मागे फिरली आणि ज्या ठिकाणी लग्न केले होते. तेथे जाऊन आताच्या आता घटस्फोट हवाय, असे सांगितले.

नवरीचे हे शब्द ऐकून कोर्टातील न्यायाधीशही हैराण झाले. कारण, या दोघांचा तीन मिनिटांपूर्वी विवाह झाला होता. परंतु मुलीने घटस्फोटासाठी हट्ट धरल्याने न्यायाधीशांनी या घटस्फोटाला मंजुरी देत लग्न रद्द केले. ही घटना सोशल मीडियावर प्रचंड मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे.

याआधी ब्रिटनमध्ये 2004 मध्ये एका जोडप्याने लग्नानंतर केवळ 90 मिनिटांत घटस्पह्टासाठी अर्ज दाखल केला होता. कारण नवऱ्याने तिच्या मैत्रिणीसोबत जरा जास्तच फ्रेंडशीप चालवली होती. नवऱ्याचे हे वागणे न पटल्याने तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.