यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा 6 धावांनी पराभव करत 66 व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. टी 20 प्रारूपात खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या प्रारंभीच्या लढतीत 147 धावांचा पाठलाग करणाऱ्या चेंबूर जिमखान्याला 141 धावांवर रोखत कुर्ला स्पोर्ट्स क्लबने दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कुर्ला स्पोर्ट्स क्लबला आर्यन मिश्र 37, मैत्रीक ठाकूरच्या 31 धावांमुळे 20 षटकांत 8 बाद 147 धावा करता आल्या. हितेश प्रजापतीने चार बळी मिळवत गोलंदाजीत छाप पाडली.
संक्षिप्त धावफलक
कुर्ला स्पोर्ट्स क्लब ः 20 षटकांत 8 बाद 147, (आर्यन मिश्रा 37, हितेश प्रजापती 4/21) वि. वि.
चेंबूर जिमखाना ः 20 षटकांत 8बाद 141 (गौरव कुरकुरे 58, यश पांडे 3/27).
युनियन क्रिकेट क्लब ः 20 षटकांत 6 बाद 145 (विश्वास गनिया 42, उद्धव मोरे 64)
वि.वि.खंडाळा क्रिकेट क्लब ः 20 षटकांत 9 बाद 144 (जे. मंदिया 56).