Kurla BEST Bus Accident – मृतांची संख्या आठवर, 52 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

कुर्ला येथे झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातातील मृतांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. सायन रुग्णालयात उपचारादरम्यान एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी या अपघातात 7 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या आता 8 झाली असून जखमींचा संख्या 41 आहे.

कुर्ला येथे 9 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान बेस्ट बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघाताच 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 41 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर जवळील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याच दरम्यान सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना 52 वर्षीय फजलू रेहमान शेख यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढून 8 झाली आहे. अपघात झाल्यानंतर बेस्ट बस चालक संजय मोरे याला अटक करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याविरोधात बस चालक सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

SC ने नशेबाजांना खडसावले, ड्रग्सचे सेवन ‘कुल’ नाही; सर्वांना केले आवाहन