कुर्ला बेस्ट बस अपघातप्रकरणी सुटकेसाठी सत्र न्यायालयात धाव घेणाऱया आरोपी चालक संजय मोरेला मुंबई सत्र न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाठारे यांनी चालक संजय मोरे याला दोषी ठरवत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी बेस्टच्या एसी बसने वाहनास व तेथील काही नागरिकांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा बळी गेला तर 42 जण जखमी झाले. याप्रकरणी बसचालक संजय मोरे याच्या विरोधात बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी व निष्पाप लोकांचा बळी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली. दंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळून लावत कोठडीची शिक्षा सुनावताच चालक मोरे याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अॅड. समाधान सुलाने यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता.