कुपवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांशी पुन्हा चकमक, जवानांचा परिसराला वेढा

जम्मू आणि कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लोलाब येथील त्रिमुखा परिसरात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोधमोहीमे दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. त्याचवेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.