Kuno National Park – गुड न्यूज! कुनो अभयारण्यात दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन, वीरा चित्त्याने दिला बछड्यांना जन्म

मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगम झाले आहे. चित्ता मादी वीराने दोन बछड्यांना जन्म दिला असून अभयारण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मध्य प्रदेशच्या भूमीवर बिबट्यांची संख्या सतत वाढत आहे, ही माहिती सांगताना मला आनंद होत आहे. आज चित्ता मादी वीराने 2 लहान बछड्यांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर या बछड्यांचे स्वागत आहे. बछड्यांच्या आगमनाबद्दल मी राज्यातील जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो, असे डॉ. मोहन यादव यांनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.

17 सप्टेंबर 2022 रोजी कुनोमध्ये सुरु झालेला प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियाहून 8 आणि साऊथ आफ्रिकेहून 12 असे 20 चित्ते आणले होते. यापैकी 8 चित्त्यांचा मृत्यू झाला होता.