
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या विडंबन गीतानंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा स्टुडिओ फोडला, तसेच त्याला जीवे मारण्याच्या धमक्या ही दिल्या. यावरून सध्या मोठ वाद सुरू असतानाच कुणाल कामाराने एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
‘एखाद्या कलाकाराला लोकशाही पद्धतीने कसे मारायचे, कशी त्याची हत्या करायची याचा मुद्देसूद क्रम 1) अशा पद्धतीने आक्रोश करायचा की त्यामुळे अनेक ब्रँड्सना त्यांचे काम थांबवावे लागेल. 2) आक्रोश असा करायचा की जेणेकरू खासगी व कॉर्परेट कंपन्या देखील काम देणं थांबवतील. 3) मोठ्याने आक्रोश करायचा जेणेकरून मोठ मोठ्या ठिकाणी जागांवर तुमचे कार्यक्रम ठेवण्याची हिंमत कुणी करणार नाही 4) हिंसात्कम आक्रोश – जेणेकरून छोट्या छोट्या जागा देखील आपले दरवाजे तुमच्यासाठी बंद करतील. 4) कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना समन्स पाठवायचे, जेणेकरून कलाकाराचा तो मंचच एखाद्या गुन्ह्याचे ठिकाण होऊन जाईल….”, असे कामराने या ट्विट मध्ये लिहले आहे.
पुढे त्याने आता कलाकाराकडे दोनच पर्याय उरले आहेत असे म्हटले. ”आता कलाकाराकडे दोनच पर्याय उरले आहेत. आपला आत्मा विकायचा आणि शांत राहून त्यांच्या हातातील बाहुलं व्हायचं किंवा हे एक प्लेबुक नाही, हे एक राजकीय हत्या आहे. ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने हत्या केली जाते”, असेही त्याने लिहले आहे.