
कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विडंबन गीतातून चांगलेच चिमटे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी मैत्रीचे संबंध असून त्यावर कुणालने गाणे गायले आहे. मोदींना उद्देशून थेट ‘तानशाह ओ तानशाह…’ असे म्हटले असून या गाण्याचाही व्हिडीओ मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
कुणालने परखडपणे म्हटले की, मोदी मेलोनीजींच्या मागे पिझ्झा पॅन घेऊन फिरत आहेत, त्यांना ढोकळा पिझ्झा शिकवत आहेत. अक्षरशः मोदीजी प्रेमात पडले आहेत. रोज रात्री दीड वाजता जिओच्या नेटवर्कवरून मेलोनी यांच्याशी चॅटिंग सुरू असते. क्या अयोध्या झॉंकी है, रोम अभी बाकी है…! मेलोनी मोदींना विचारतात, व्हू आर यू नरेंद्र… मोदीजी बोलतात… वन नेशन, वन परफॉर्मर…! असे एकापेक्षा एक विडंबनात्मक फटकारे कुणाल कामराने गाण्यातून लगावले.
मोदींवर गायलेले गाणे
झूठा हू मैं कातिल हू मै…
सब घोटालो में शामिल में हू…
एमपी चुराना व्हॉइसेस दबाना…
बस येही मेरा कसूर…
वादों से अपने मुकरता नही…
पुरा उन्हे कभी करता नही…
तानशाह ओ तानशाह…
तानशाह ओ तानशाह…