मी माफी मागणार नाही, अजित पवार एकनाथ शिंदेंबद्दल जे बोलले तेच मी बोललो – कुणाल कामरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यावरून झालेल्या वादानंतर महायुतीमधील नेते आणि मिंधे गटाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्याच्यावर कायदेशीय कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. यावरच आता कुणाल कामराने आपल्या इंस्टग्रामवर एक भलीमोठी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी माफी मागणार नाही, अजित पवारांनी एकनाथ शिंदेंबद्दल जे बोलले तेच मी बोललो, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाणं केलं म्हणून मिंधे गटाने कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. यावरच भाष्य करत तो आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, “मनोरंजन स्थळ हे फक्त एक व्यासपीठ असतं. सर्व प्रकारच्या शोसाठी एकच जागा. माझ्या विनोदासाठी हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही ठिकाण) जबाबदार नाही, किंवा मी काय बोलतो किंवा करतो यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. मी काय बोलतो किंवा करतो यावर कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणतेही नियंत्रण नाही.”

एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाणं केलं म्हणून मिंधे गटाने कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. यावरच भाष्य करत तो आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, एखाद्या कॉमेडियनच्या शब्दांसाठी ठिकाणावर हल्ला करणं हे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकवर हल्ला करण्यासारखं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kamra (@kuna_kamra)