मेरी नज़रसे तुम देखो तो गद्दार नज़र वो आये… ठाण्याच्या दाढीवाल्याची कुणाल कामराने केली हजामत

‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो पे चष्मा, हाये… एक झलक दिखलाये, कभी गुवाहाटी मे छुप जाये, मेरी नजर से तुम देखो, तो गद्दार नजर वो आये…’, असे विडंबन गीत गात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने ठाण्यातील दाढीवाल्याची अक्षरशः हजामत केली. कुणालचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीपासून यांनी जे केले, त्याबद्दल बोलावेच लागेल. शिवसेना भाजपमधून बाहेर आली. पुन्हा शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटन दिले. ठाण्यातील एकाने हे चालू केले, असे सांगत कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता विडंबन गीतातून सालटी काढली.

कुणालने गायलेले गाणे..
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
एक झलक दिखलाये
कभी गुवाहाटी मे छुप जाये
मेरी नजर से तुम देखो
तो गद्दार नजर वो आये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है…
और कहा क्या जाये?
जिस थाली में खाये
उसमेही छेड कर जाये
मंत्रालय से ज्यादा
फडणवीस के गोदी में मिल जाए
तीर कमान मिला है इसको
बाप मेरा ये चाहे
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…

गद्दारांच्या चौर्यकर्माचीही कुणाल कामराने चांगलीच टर उडवली. घराणेशाही बोलून दुसऱयाचा बाप चोरला. यावर काय बोलणार! उद्या मी सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटेन आणि त्याला लंचचे निमंत्रण देईन. अर्धा तास तेंडुलकरची प्रशंसा करेन. नंतर आजपासून तेंडुलकर माझा बाप आहे असे म्हणेन. हे चालेल का, असा सवाल कुणालने केला.

हजामत झोंबली; मिंधे गटाकडून सेटची तोडफोड

कुणाल कामराने विडंबन गीतातून केलेली दाढीवाल्याची हजामत मिंधेंना चांगलीच झोंबली आणि त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. जवळपास 40 ते 50 मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी-एमआयडीसी परिसरातील शोच्या सेटवर धुडगुस घातला. तसेच इतर ठिकाणीही आदळआपट केली.