
स्टँड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने ‘गद्दार’ गीतामधून मिंधेंना झोडपून काढले. हे ‘गद्दार’ गीत झोंपल्याने मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी खार येथील ‘हॅबिटेट’ स्टुडिओत धुडगूस घातला आणि तोडफोड केली. आता त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही दिले जात आहेत. कुमाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन आल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मिंधेंवर ‘गद्दार’ गीत केल्यापासून कुणाल कामराला धमकीचे फोन केले जात आहेत. त्याला तुकडे-तुकडे करण्याची धमकी मिळत आहे. यादरम्यान एका फोन कॉलचा ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात कुमाल आपण तामीळनाडूमध्ये असल्याचे सांगत असून फोन करणारा व्यक्ती तामीळनाडूमध्ये कैसे आयेंगे भाई, असे म्हणताना ऐकू येत आहे.
हम होंगे कंगाल… देश का सत्यानाश, माफी नाही… पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर; कुणाल कामराने पुन्हा चोपले
दरम्यान, दुसरीकडे कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहे. खार पोलिसांनी त्याला व्हॉट्सअपवरून समन्स पाठवले आहे, तसेच फोनवरून त्याची प्राथमिक चौकशीही केली आहे. पोलिसांनी त्याला मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत खार पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र कामराच्या वकिलांनी पोलिसांकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे.
…तर पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर करेन, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार