Kunal Kamra Controversy – अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच तुमचे नेते तुरुंगात गेले होते ना!

तुमचे पूवींचे नेते आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच तुरुंगात गेले होते ना! मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतले पाहिजे, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हाणला. “गद्दार गुवाहाटीला गेले तो इतिहास बदलायचा का?” अशा शब्दांत कुणाल कामरा प्रकरणावरून सरकारचा समाचार घेतला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आधी संविधान वाचावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल. आणीबाणीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सेन्सॉरशिप लादली, विरोधकांचा आवाज दडपला. त्या टीका सहन करीत नाहीत म्हणून याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी फडणवीस यांचे पूर्वीचे नेते, माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी तुरुंगात गेले होते, असा टोला हाणला.