
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली, परंतु ही ऑफर कुणाल कामराने नाकारली आहे, असा दावा केला. परंतु बिग बॉसने हा दावा फेटाळून लावला आहे. कुणालने व्हॉट्सऍपवर एक क्रीनशॉट शेअर केला असून यामध्ये मेसेज पाठवणाऱयाने स्वतःला ‘बिग बॉस’च्या कास्टिंगमध्ये कार्यरत असल्याचा दावा केला आहे. परंतु या ऑफरला नकार देताना कुणाल कामराने म्हटले की, ‘बिग बॉस’मध्ये जाण्यापेक्षा मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणे पसंत करेन.