हिंदुस्थानच्या कोळंबीची अमेरिका, चीनला भुरळ
माशांच्या निर्यातीत हिंदुस्थानने चांगली कामगिरी केली. 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत हिंदुस्थानने सीफूड निर्यातीतून 60,523 कोटी रुपये कमावले. यामध्ये कोळंबीच्या विक्रीतून हिंदुस्थानने सर्वात मोठी कमाई केली. अमेरिका हा देशाचा सर्वात मोठा सीफूड आयातदार ठरला आहे. अमेरिकन बाजारपेठेत ज्या विशिष्ट माशांना सर्वाधिक मागणी होती ती फ्रिझन कोळंबी होती, जी अमेरिकेच्या एकूण आयातीपैकी 91.9 टक्के होती. चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा खरेदीदार राहिला.
मोदींचा पुतण्या कुंभमेळय़ात तल्लीन
प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्यात अनेक पेंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली आणि पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदीदेखील आपल्या मित्रांसह कुंभमेळ्यात पोहोचल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यांनी मित्रांसोबत संत कबीरांची भजने गायली. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधानांचे पुतणे असूनही ते महापुंभात सामान्यांप्रमाणे वावरत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडीओत पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज मोदीही दिसत आहेत.
देशातील 17 राज्ये हरवली दाट धुक्यात
देशभरातील 17 राज्यांमध्ये आज दाट धुके पाहायला मिळाले. दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक गाडय़ांना उशीर झाला. त्याचबरोबर विमान सेवाही प्रभावित झाली. उत्तर प्रदेशात 14 गाडय़ा उशिराने व त्याच वेळी 2 उड्डाणेही रद्द करण्यात आली. धुक्यामुळे दिल्लीहून प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या पर्यटकांच्या बसला कानपूर-प्रयागराज महामार्गावर अपघात झाला. यात 10 जण जखमी झाले. हरयाणात दृश्यमानता 5 मीटरपर्यंत कमी झाली असून मध्य प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये 50 मीटरच्या पुढे काहीच दिसत नसल्याचे चित्र आहे.
आता एलन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष – कॅमेरून डियाज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर एलन मस्क यांचा वाढता प्रभाव दिसत आहे. अशातच हॉलीवूड अभिनेत्री कॅमेरून डियाजच्या वक्तव्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता एलन मस्क हे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत, असे वक्तव्य कॅमेरून डियाजने केले. पॅमेरूनची ‘बॅक इन अॅक्शन’ ही फिल्म नेटफ्लिक्सवर येत आहे. त्याच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेले वक्तव्य चर्चेत आलंय. एका मुलाखतीत कॅमेरूनने मस्करीत ट्रम्प आणि मस्क यांना कोपरखळी लगावली आणि एलन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असे ती म्हणाली.
समृद्ध देशाच्या निर्मितीसाठी सल्ला प्रेरणादायी
नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम यांनी केलेल्या विधानाचा उद्देश हा महत्त्वाकांक्षी तरुणांना समृद्ध देशाच्या निर्मितीसाठी कठोर परिश्रम करण्याच्या हेतूने प्रेरित करणे हा होता, असे चिदंबरम म्हणाले. मला अधिक काळ काम करायला आवडते असेही ते म्हणाले. कायद्याचा अभ्यास, संसदीय कार्य, लेखन आणि सार्वजनिक जीवनातील सहभाग अशी उदाहरणेही त्यांनी दिली आहेत.
यशस्वी व्यक्तींचा सल्ला देण्याचा अधिकार
हिंदुस्थान हा विकसनशिल देश आहे तसेच त्यांचे विधान हे उत्पादन वाढवण्यासाठीचा उद्देश दर्शवते. आयुष्यात मोठे यश मिळवल्यानंतर आणि उच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते हिंदुस्थानवासीयांसाठी कामाचे तास वाढवण्याबाबत सल्ला देण्याच्या योग्यतेवर पोहोचल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपवर करा आवडते स्टिकर तयार
व्हॉट्सअॅप या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता सेल्फी स्टिकर्स तयार करता येणार आहे. इतरांसह स्टिकर पॅक शेअर करण्याची सुविधाही मिळणार आहे. यासोबतच पह्टो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी नवीन फिल्टरचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. मेटाने व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन अपडेट आणले आहे, ज्याद्वारे ही वैशिष्टय़े जोडण्यात आली आहेत. व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपने नवीन वर्षात ही पर्वणी दिली आहे.