कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. येत्या 24 एप्रिल रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि हिंदुस्थानच्या विकासाच्या गाथेत दिलेल्या अनमोल योगदानासाठी पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.