कुलदीप यादववर जर्मनीत शस्त्रक्रिया

हिंदुस्थानचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवच्या पाठीवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पाठीच्या दुखापतीने तो त्रस्त होता. या फिरकीपटूने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले, एका फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. ‘बरे होण्यासाठी म्युनिकमध्ये काही दिवस,’ असे कुलदीपने या पोस्टवर लिहिले आहे.

29 कर्षीय कुलदीपला काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात कायम ठेवण्यात आले होते. दिल्लीने त्याला 1.25 कोटी रुपयांमध्ये मोबदल्यात संघात कायम ठेकले आहे. कुलदीपने शेवटची कसोटी न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे खेळली होती, मात्र त्यानंतर दुखापतीमुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवड झाली नाही.

22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी संघ सोडताना बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी कुलदीपच्या दुखापतीचा उल्लेख केला होता. बंगळुरूतील चाचणीनंतर त्याला नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी वैद्यकीय तज्ञांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

फेब्रुवारीमध्ये मैदानावर परतण्याची शक्यता

कुलदीप यादव फेब्रुवारीपर्यंत मैदानात परतू शकतो. हिंदुस्थानी संघाला या महिन्यात होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायचे आहे. या वन डे स्पर्धेच्या दृष्टिकोनातून कुलदीपचे पुनरागमन संघासाठी महत्त्काचे ठरणार आहे. तसे झाले नाही तर टीम इंडियासाठी हा धक्काच ठरेल. कुलदीप यादव पांढऱया चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. 29 जूनला टी-20 कर्ल्ड वप जिंकणाऱया हिंदुस्थानी संघाचा तो एक सदस्य होता.