केआरपी इलेव्हनला प्रेसिडेंट कप स्पर्धेचे विजेतेपद

केआरपी इलेव्हनने एमसीए प्रेसिडेंट कप सी अँड डी डिव्हिजन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा 11 धावांनी पराभव केला. सलामीवीर तनिषा शर्माची (58) अर्धशतकी खेळी विजयाची शिल्पकार ठरली.

केआरपी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 140 धावा केल्या. तनिषा शर्माने 83 चेंडूत 10 चौकारांसह दमदार अर्धशतक झळकावताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रांजल सोनी (35) आणि निधी घरतने (ना. 23)तिला चांगली साथ दिली. केआरपीचे आव्हान साईनाथ स्पोर्ट्स क्लबला पेलवले नाही. त्यांना 20 षटकांत 7 बाद फेरी 129 धावाच करता आल्या. अद्वैता तोरस्कर आणि परिष्टी छेडाने दोन-दोन विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून रोखले.

संक्षिप्त धावफलक केआरपी इलेव्हन – 20 षटकांत 3 बाद 140(तनिषा शर्मा 58 , प्रांजल सोनी 35, चेतना कांबळे 23ना.) वि. साईनाथ एससी – 20 षटकांत 7 बाद 129(श्रीनी सोनी 36 , निधी घरत 28; अद्वैत तोरस्कर 2/25, परिष्टी छेडा 2/36).