कृती सेननने अलिबागेत खरेदी केली प्रॉपर्टी
बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनन हिने अलिबागेत ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’च्या लक्झरी प्रोजेक्टमध्ये 2 हजार वर्ग फीटचा प्रीमियम प्लॉट खरेदी केला. या प्लाटची किंमत जवळपास 2 कोटी रुपये इतकी आहे. या प्लॉटला गुरुवारी खरेदी करण्यात आले. याआधी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’कडून 10 हजार वर्ग फुटांचा प्लॉट खरेदी केला. त्याची किंमत 10 कोटींहून अधिक आहे. मी माझ्या बळावर जमीन खरेदी केली. त्यामुळे मला खूप चांगले वाटत आहे. मला बऱयाच दिवसांपासून अलिबागमध्ये प्लॉट खरेदी करायचा होता, असे कृती सेननने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील अनेकांनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे.
जेफ बेजोस यांनी विकले शेअर्स
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी 452 मिलियन डॉलर इतके मूल्य असलेले अॅमेझॉनचे शेअर्स विकले आहेत. 9 जुलै रोजी बेजोस यांनी 200.1198 डॉलर प्रतिशेअरनुसार हे शेअर्स विकले आहेत. शेअर्सची विक्री पूर्वनियोजित होती. यानंतर बेजोस यांच्याकडे अॅमेझॉनचे 928433873 शेअर्स आहेत. या विक्रीनंतर बेजोस यांच्याकडे अॅमेझॉनच्या शेअर्सची 8.8 टक्के हिस्सेदारी आहे. गुरुवारी अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये 2.37 टक्क्यांनी घट झाली.
1900 मेट्रो प्रवाशांना दंड
प्रवाशांकडे तिकीट असूनही दिल्ली मेट्रोने तब्बल 1900 जणांना महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास केल्याने दंड बजावला आहे. या प्रवाशांकडून प्रत्येकी 250 रुपये वसूल करण्यात आले. यंदा जानेवारी ते जूनदरम्यान दिल्ली मेट्रोने महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱया 1906 प्रवाशांवर कारवाई केली आहे. मे महिन्यात सर्वाधिक 443 जणांवर, तर एप्रिलमध्ये 419, फेब्रुवारी 408, मार्च 270, जानेवारी 245 आणि जूनमध्ये 121 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वेची वेबसाईट ठप्प
रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट शुक्रवार सकाळपासूनच ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळणे मुश्कील झाले आहे. युजर्सना वेबसाईटवर आज सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. आयआरसीटीसीची वेबसाईट आणि मोबाईल ऑप्लिकेशन या दोघांमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडिया एक्सवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रेल्वेनेही प्रतिक्रिया दिली असून पूर्वमध्य रेल्वे आणि ईस्टर्न रेल्वेचा सर्व्हर डाऊन झाल्याने ही समस्या उद्भवली.
एसर कंपनीचा मोबाईल येणार
लॅपटॉप बनवणारी प्रसिद्ध कंपनी एसर इंक आता हिंदुस्थानात स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने शाओमीशी टक्कर देण्याची जोरदार तयारी सुरू केली असून हिंदुस्थानातील इंडकल टेक्नॉलॉजीसोबत मोबाईल निर्मितीचा करार केला आहे. याच वर्षी पंपनीचा मोबाईल बाजारात येण्याची शक्यता आहे. करारानुसार इंडकल देशात एसर ब्रॅंडचा स्मार्टपह्न डिझाइन, निर्मिती आणि वितरण करणार आहे. पंपनीने केलेल्या घोषणेनुसार एसरचा फोन याच वर्षी बाजारात दाखल होणार आहे.
बँक ऑफ बडोदाचे कर्ज महाग
बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँक ऑफ बडोदाचे कर्ज महागले असून त्यामुळे कार आणि गृहकर्जाचा हफ्ता (ईएमआय) वाढणार आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट्समध्ये (एमसीएलआर) वाढ केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. एमसीएलआर कर्जाच्या दराशी संबंधित असून यात वाढ झाल्यास ग्राहकाच्या महिन्याच्या कर्जाच्या ईएमआयमध्येदेखील वाढ होते. एमसीएलआर वाढल्याने कर्जाचे दर 8.15 ते 8.90 टक्क्यांच्या दरम्यान आहेत.