कोपरगाव बेटातील श्री शुक्राचार्य मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना गाभाऱ्यावर एक तळघर सापडले आहे. हे तळघर नेमके कशा करता बांधण्यात आले होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 बाय 12 जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदीर असावे असा अंदाज बांधला जात असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. हे तळघर पाहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री गुरुशुक्राचार्य महाराज यांच्या पुरातन मंदरीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती मंदिर अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली आहे. यावेळी सदर भुयार आढळले असल्याचे त्यांनी सांगितले. गाभाऱ्याची दुरुस्ती सुरु असताना सभामंडप भागात कोणी कधीही न पाहिलेली छोटी खिडकी आढळून आली. ती खिडकी उघडली असता संभामंडपाच्या गच्चीखाली 12 बाय 12 या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदिर असावे असा अंदाज मंदिर वरीष्ठांकडून लावला जात आहे.