कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे भरदिवसा एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतू या घटनेमुळे उक्कडगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
पुष्पराज उत्तम निकम सकाळी साडे नऊच्या सुमारास शाळेत जात असताना घोयेगाव रोडवर अशोक बाबुराव शिंदे यांच्या घरा पुढे दोघे जण दुचाकीवर आले. त्यांनी पुष्कराजला जवळ बोलावून घेतले, व तुला आम्ही गाडीवरून शाळेत सोडतो असे सांगितले. ही बाब निकम यांच्या लक्षात येताच त्यांनी गावकऱ्यांह दोघांचा पाठलाग केला. गावकरी पाठलाग करत असल्याचे जाणवताच संशयित आरोपी असलम अजमेर पठाण व मस्तान खान पठाण दोघेही मक्याच्या शेतात जाऊन लपले. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळील दुचाकी देखील जप्त केली आहे.