Kopargaon News – थातूरमातूर उत्तरं देणाऱ्या वीज वितरण अधिकाऱ्यांना 15 ऑगस्टचा अल्टिमेटम

कोपरगाव प्रभाग क्रमांक दोन मधील रहिवाशांच्या मागणीवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून रोहीत्रांवरील भार 80 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे रोहित्र क्षमता वाढविणे किंवा नवीन रोहित्र टाकणे हे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. तसेच सदर रोहीत्रांवरील तीनही फेजचा भार (एंपियर मध्ये) तीनही फेजला सारखा विभागण्यात येण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे थातूरमातूर उत्तरे देत त्यांच्या निवेदनाची बोळवण केली.

30 जुलै रोजी शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील निवारा, सुभद्रा नगर, रिद्धी सिद्धीनगर, जानकी विश्व कॉलनी व येवला रोड येथील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नवीन विद्युत रोहित्र व जुन्या रोहीत्रांची क्षमता वाढवून द्यावी अशी मागणी येथील रहिवाशांच्या वतीने करण्यात आली होती. अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिला होता. यावेळी 500 स्थानिक नागरीकांच्या सह्या असलेले निवेदन विज वितरण कंपनीचे शहर उपविभागीय अतिरिक्त अभियंता धांडे यांना देण्यात आले होते.

या निवेदनासंदर्भात वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अतिरिक्त अभियंता धांडे यांनी त्या रोहीत्रांवरील एलटी साईडचा जास्तीत जास्त भार घेण्याची क्षमता 133.33 एंपियर असताना वरील रोहीत्रांवरील भार (एंपियर मध्ये)80 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे रोहित्र क्षमता वाढविणे किंवा नवीन रोहित्र टाकणे हे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. तसेच सदर रोहीत्रांवरील तीनही फेजचा भार (एंपियर मध्ये) तीनही फेजला सारखा विभागण्यात येण्याची कार्यवाही करण्यात येईल.असे थातुर-. मातुर उत्तरे सात ऑगस्ट च्या पत्राद्वारे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी देवून केवळ वेळ. निभावून जनार्दन कदम यासह प्रभागातील 500 नागरिकांची अक्षरशः बोळवण केली.

रोहीत्रांवरील भार (एंपियर मध्ये) 80 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे रोहित्र क्षमता वाढविणे किंवा नवीन रोहित्र टाकणे हे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.असे एक अधिकारी सांगतो तर दुसरा अधिकारी म्हणतो मंजुरीसाठी वरती पाठवले आहे मग कोणाचे खरे? या भागात सातत्याने विजेचा लपंडाव का होतो ? आणि जर तीन फेजवर अनियमित भार असेल तर मग तीनही फेजला सारखा भार विभागण्यासाठी त्रस्त ग्राहक व नागरिकांच्या उपोषणाची वाट पाहता काय ? असा संतप्त सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. वीज व्यवस्था सुरळीत होण्यासाठी 15 ऑगस्ट चा अल्टीमेटम येथील रहिवासी व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिला आहे.