गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वेने या मार्गावरच्या गाड्याही वाढवल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर 325 पेक्षा जास्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवदरम्यान वाढत्या प्रवाशांची संख्या पाहता मध्ये आणि पश्चिम रेल्वेने नियोजन केले होते. तरीही सर्व गाड्या फुल्ल झाल्या होत्या. गणेशोत्सव सुरू झाला असला तरी अजून सहा ते सात लाख प्रवासी कोकणात दाखल होतील. त्यामुळे पनवेल आणि मडगाव दरम्यान दोन गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
रेल्वेने मडगाव-पनवेल-मडगाव या विशेष गाडीचे आयोजन केले आहे. हा गाडी मडगाववरून 15 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता सुटेल तर त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता पोहोचेल
हीच गाडी 15 सप्टेंबररला रात्री 11.45 वाजता पनवेलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मडगावला 11 वाजता पोहोचेल. या गाडीची बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.