
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे आहे. कारवार येथील मदुरे-पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे बोगद्यातून पाणी वाहू लागल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी रात्री तीन वाजता बोगद्यात पाणी जास्त तीव्रतेसह वाहत होते. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
या गाड्या रद्द करण्यात आल्या
– 10 जुलैची गाडी क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेस रद्द
– गाडी क्र. 12051 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्सप्रेस रद्द
– गाडी क्र. 10103 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडोवी एक्सप्रेस रद्द
– 9 जुलै रोजीची गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु जं. रद्द
– गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. मंगला एक्सप्रेस पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव मार्गे वळवली
– गाडी क्र. 10104 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडोवी एक्स्प्रेस रद्द
– गाडी क्र. 50108 मडगाव जं. – सावंतवाडी रोड रद्द
– गाडी क्रमांक 22120 तेजस एक्स्प्रेस रद्द
– गाडी क्र. १२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द
– गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस रद्द