जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्प्रेस 31 जानेवारीपर्यंत ठाणे, दादरपर्यंतच धावणार

कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्प्रेस या गाडय़ा 31 जानेवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणारी गाडी क्रमांक 12134 मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. गाडी क्रमांक 22120 मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्प्रेस आणि गाडी क्रमांक 12052 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे देण्यात आली आहे.