
कोकणात शिमगोस्तव उत्साहात पार पडला. गावोगावी पालखी उत्सव रंगले, पालख्या नाचवण्यात आल्या. तरुण, महिला आणि वृद्धांसह सर्वच मोठ्या उत्साहात या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी पालखी नाचवली.
रोजच्या राजकीय धावपळीतून वेळ काढून आमदार भास्कर जाधव तुरंबव येथील शारदादेवी मंदिराच्या शिमगोत्सवात सहभागी झाले होते. शारदादेवी मंदिराचा शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी भास्कर जाधव यांनी पालखी नाचवली. कोकणात मोठ्या उत्साहात गावोगावी शिमगोत्सव साजरा करण्यात आला.