वळणेत भात शेतीच्या लावणीची लगबग सुरू

दापोलीत लावणी योग्य पाऊस पडत असल्याने भात शेतीच्या लावणीची जोरदार लगभग सुरू झाली आहे. दापोली तालूक्यातील सर्वच ठिकाणच्या गावांमध्ये भात लावणीची कामे सुरू झालेली आहेत. अशाप्रकारे वळणे मोठीवाडी येथे ही भात लावणीचे काम सुरू झाले आहे.
कोकणातील भात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती आहे. कोकणात पाऊस पडतो तेव्हा तो मुसळधार कोसळतो. धो धो मुसळधार कोसळणा-या पावसाचे पाणी कोकणातील उतार भागातून थेट समुद्राला जावून मिळते. नदी किंवा धरणातील पाण्यावर भात लावणी क्वचितच ठिकाणी केली जाते बाकी बहुतेक ठिकाणी नदी किंवा धरणाच्या पाण्याची सोय नाही म्हणून खरीप हंगाम हा पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतो. त्यामळे पावसाचे पाणी शेतात होताच येथील शेतकरी हे भात लावणीच्या कामाला सुरूवात करतात.
दापोलीत बैलांच्या नागराच्या सहाय्याने शेतीची नागरट करतात त्यात आता हळू हळू  थोडा फार बदल होत  बैलांच्या नांगराची जागा ही पाॅवर ट्रिलरने घेतली आहे असे असले तरी पाॅवर ट्रिलर सर्वच शेतक-यांकडे नसल्याने भात शेतीच्या नागरणीसाठी पाॅवर ट्रिलर हे भाडयाने घ्यावे लागतात. भाडयाने पाॅवर ट्रिलर घ्यायचे म्हटले तर सगळयांनाच पाॅवर ट्रिलरचे भाडे परवडत नाही त्यामुळे अजूनही कुदल्याने खनून शेतीची नागरनी केली जाते तसे  वळणे मोठीवाडी येथील सुरेश येसवारे, गंगाबाई येसवारे, अनिता तेरेकर या शेतक-यांनी पावसाचे पाणी होताच वाट न पाहता हाती कुदळ घेत शेत जमीन कुदळून भात लावणी सुरू केली.