Dapoli News : आंघोळीसाठी हर्णे येथील खेम धरणात उतरलेला एकजण बुडाला

दापोलीतील हर्णे येथील खेम धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या चार जणांपैकी एकजण पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना दापोलीत घडली आहे. मात्र पावसाचा जोर पाहता आणि अंधारामुळे शोध कार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी सदर बुडालेल्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहीती दापोली महसुल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दापोली तालूक्यातील सातांबा या गावातील 4 मुले ही दापोली येथे गेली होती. ते चारही जण आपल्या सातांबा गावी परत न येता परस्पर हर्णे येथील खेम धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले. त्यातील 19 वर्षाचा कल्पेश बटावले हा तरूण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दापोली तहसील प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहीतीनुसार, सातांबा येथील 4 मुले ही दापोली येथे गेली होती ते परत आपल्या सातांबा या गावी न येता परस्पर चारही जण हर्णे येथील खेम धरणात आंघोळीसाठी धरणाच्या खोल पाण्यात उतरले. त्यातील कल्पेश बटावले हा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने हर्णे खेम धरणाच्या पाण्यात बुडाला आहे. तर यातील अन्य मुले मात्र सुखरूप आहेत. पोलीस प्रशासन बुडालेल्या मुलाचा धरणातील पाण्यात शोध घेत होते. मात्र दापोलीत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि सायंकाळी झालेल्या अंधारामुळे तसेच धरणातील पाण्याची खोली मोठी असल्याने शोध कार्यात अडचणी आल्याने आता दुस-या दिवशी सोमवारी सकाळी सदर बुडालेल्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहीती दापोली महसुल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.