जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती आणि हिंदुस्थानची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पी मे महिन्यात नॉर्वे येथे होणाऱया बुद्धिबळ महिला स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या महिलांच्या क्लासिकल बुद्धिबळात जगात सहाव्या क्रमांकावर असलेली खेळाडू हम्पीचे लक्ष्य या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रभाव पाडण्याचे असेल. हम्पी 2002 मध्ये ग्रॅण्डमास्टर होणारी हिंदुस्थानची पहिली महिला खेळाडू ठरली होती. दोनवेळा 2019 आणि 2024 मध्ये जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी हम्पी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.