64 घरांची राणी! बुद्धिबळात कोनेरू हम्पीने रचला इतिहास, पटकावला World Rapid Chess Championship किताब

हिंदुस्थानची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने धमाकेदार कामगिरी करत FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2024 च्या किताबावर दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. तीने इंडोनेशियाच्या इरीन सुकंदर हिचा पराभव केला आहे. या विजयासह दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरवार अशी कामगिरी करणारी ती दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे.

अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी सहा खेळाडू 7.5 गुणांसह कोन्हेरू हम्पी सोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर होते. या खेळाडूंमध्ये जू वेनझुन, कॅटरिना लागनो, हरिका द्रोणावल्ली, अफरोजा खामदामोवा, टॅन झोंग्यी आणि इरीन या खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंचे सामने अनिर्णित सुटले, परंतु हम्पीने इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरचा अंतिम फेरीत पराभव केला आणि विजेतेपद सुद्धा पटकावले. 2023 साली हम्पीला परभावला सामोरे जावे लागले होते. परंतु यावेळी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत तिने विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2019 साली जॉर्जिया येथे कन्हेरू हम्पीने वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.