
ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि मिंधे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचे दुष्परिणाम आज दिसून आले. शिवप्रेमींमध्ये घुसलेल्या समाजपंटकांनी गडावर दहशत माजवली. गडावर आणि पायथ्याशी दगडफेक करून प्रार्थनास्थळांसह घरे, वाहनांची प्रचंड नासधूस आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवरही तलवारीचे वार झाले. हिंसाचारात सात अधिकाऱयांसह 12 पोलीस आणि 6 नागरिक जखमी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून उद्यापासून ही अतिक्रमणे हटवण्याबाबत सांगण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी सायंकाळी गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याबाबत कोणतीही अधिपृत माहिती देण्यात आली नव्हती.
छत्रपती शिवाजी महाराज यांना संकटातून वाचविणारा विशाळगड गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या संकटात अडकला आहे. रायगडनंतर स्वराज्याची राजधानी राहिलेल्या या गडाला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाला हालचाल करावी लागली. गडावरील 158हून अधिक अतिक्रमणे हटविण्यासाठी एक कोटी 64 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. पण गेली दीड वर्ष झाली तरी ही अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार काहीच हालचाल करत नाही. तसेच न्यायालयात एकही सुनावणी झाली नसल्यामुळे गेल्या रविवारी संभाजीराजे यांनी ‘चलो विशाळगड’चा नारा दिला होता. तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडूनही या अतिक्रमणावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार राज्यभरातून शिवप्रेमी मोठय़ा संख्येने विशाळगडावर येणार असल्याचे सांगितले जात होते.
शिवप्रेमींसह संभाजीराजे आज सकाळी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवप्रेमींसह रवाना झाले. पण ते विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच काही समाजपंटकांनी गडावरील प्रार्थनास्थळासह काही घरावर दगडफेक केली. शस्त्र्ाs घेऊन गडावर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गडावरील स्थानिकांनीही ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांची प्रचंड दमछाक होताना दिसून आली. संभाजीराजे पोहोचण्यापूर्वीच राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी विशाळगडाकडे जाणाऱया मार्गावर मोठी गर्दी केली होती. यावेळी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर हद्दीत हिंसक झालेल्या जमावाने रस्त्याकडेला असलेल्या घरांवर आणि प्रार्थनास्थळावर दगडफेक करून नुकसान केले. पत्रकार, छायाचित्रकार, पॅमेरामन यांनाही टार्गेट करण्यात आले.
संभाजीराजे विशाळगडावर पोहोचल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, अतिक्रमणाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी दाखल झाले. दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उद्यापासून विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर संभाजीराजे यांनी गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही काही समाजपंटकांकडून पायथ्याशी असलेल्या घरांची, प्रार्थनास्थळाची तोडफोड केली.
z अनेक घरांत घुसून लुटमारीच्या घटना घडल्या. पेट्रोल ओतून आगी लावण्याचे प्रकार घडले. त्यामुळे चार ते पाच घरांतील सिलेंडरचे स्पह्ट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. या दंगलीत 20 ते 25 चारचाकी वाहने तसेच 30 ते 40 दुचाकीचे नुकसान करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ततेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका जाहीर करूनही या आंदोलनादरम्यान पोलीस पुमक कमी प्रमाणात ठेवण्यात आली होती. राज्यभरातून मोठय़ा संख्येने शिवभक्त येथे दाखल झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांसमोरच अनेक दुकाने, घरे, प्रार्थनास्थळाला लक्ष करून आग लावण्याच्या घटना यावेळी घडल्या. अवघ्या तीनशे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी होता. यामुळे जमावाला नियंत्रणात आणताना पोलिसांना मर्यादा आल्याने, अतिक्रमण असलेल्या विशाळगडापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गजापूर हद्दीतील अनेक घरे यामुळे उद्ध्वस्त झाली.