शिरोळ – पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातला, पुढे अनर्थ घडला; 6 जणांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून शिरोळ तालुक्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावांना जोडणारे रस्तेही जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर-ट्रॉली नेण्याचा प्रयत्न अंगाशी आला आहे. जोरदार प्रवाहात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह आठ जण वाहून गेले आहेत. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास अकिवाट- बस्तवाड मार्गावर ही घटना घडली.

Displaying IMG_20240802_142944.jpgमिळालेल्या माहितीनुसार, अकिवाटमधील पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी काहीजण जात होते. तर काहीजण केळीच्या शेतात कामासाठी जात होते. परंतु ट्रॅक्टर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली आणि आठजण वाहून गेले.

Displaying IMG_20240802_142829.jpgदरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांपैकी 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर दोन जण अद्यापही बेपत्ता आहे. एनडीआरएफचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान त्यांचा शोध घेत आहे.