
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर हा अद्यापही फरार आहे. कोरटकर हा कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईला फरार झाल्याचं बोललं जात आहे. यातच आता त्याचा शोध घेण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी माहिती देताना कोल्हापूर पोलिसांनी सांगितलं की, प्रशांत कोरटकर हा अजून फरार आहे. 17 मार्च रोजी सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यापासून तो फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे शोध पथक नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या तीन ठिकाणी गेलं आहे. त्याच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी केला आहे.