कोल्हापूरात शिवशंभूद्रोही कोरटकरच्या नावाने शिमगा, बोंबला रे बोंबला खच्चून बोंबला

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरची प्रतिकात्मक होळी कोल्हापूरात करण्यात आली होती. यावेळी आज होळी उद्या नळी कोरटकर मेला संध्याकाळी…बोंबला रे बोंबला कोरटकरच्या नावाने खच्चून बोंबला… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

होळी सणाचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. दुपारी दारोदारी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. तर सायंकाळी गल्लोगल्ली विविध मंडळे, धार्मिक देवस्थानामध्येही विधिवत व पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून साजरी करण्यात आली. यावेळी टमक्यां आणि स्टेरीओच्या दणदणाटात वातावरण होळीयम झाले होते. वाईट विचारांच्या प्रवृत्तीला होळीच्या अग्नीत जाळण्याचा उद्देश सांगितला जातो. याच उद्देशाला डोळ्या समोर ठेवत काही कोल्हापूरातील काही ठिकाणी शिवशंभूद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. आज होळी उद्या नळी कोरटकर मेला संध्याकाळी… कोरटकरच्या नावाने खच्चून बोंबला… अशा घोषणा देत प्रशांत कोरटकरचा निषेद करण्यात आला.