
कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्याला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. अंतिम सामन्यादरम्यान दोन संघामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या दोन प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये सामना सुरू असताना ही मारामारी झाली. हाणामारी का झाली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. खेळाडूंना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
कोल्हापूरमध्ये उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या दोन संघात अंतिम सुरू होता. सामना सुरू असतानाच अचानक दोन्ही संघामध्ये मारामारी सुरू झाली.
मैदानात हाणामारी सुरू होताच एकच गर्दी उसळली. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.